देशात पावसाचा हाहाकार : बद्रीनाथ हायवेचा रस्ता कोसळला !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ जुलै २०२३ । देशातील अनेक राज्यात पावसाचा हाहाकार सुरु असतांना राज्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या डोंगराळ राज्यांमध्ये पावसाने रस्ते बंद आहेत. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गाचा सुमारे 200 मीटर वाहून गेला आहे. महामार्ग बंद झाल्यामुळे 1000 हून अधिक भाविक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत.

हिमाचल प्रदेशात जूनपासून ढगफुटीच्या जवळपास 35 घटना घडल्या आहेत. गेल्या 24 दिवसांत 27 वेळा ढगफुटी झाली. पुरामुळे 158 लोकांचा मृत्यू झाला आहे. 606 घरांची पडझड झाली असून 5363 घरांचे नुकसान झाले आहे. त्याचवेळी दिल्लीत पुन्हा पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यमुना अजूनही धोक्याच्या पातळीवर आहे. मंगळवारी सकाळी 205.45 एवढी पाणीपातळी नोंदवण्यात आली. आज येथेही पावसाची शक्यता आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम