पावसाचा मुंबईला तडाखा! घरी पतरणाऱ्या मुंबईकरांचा खोळंबा, स्टेशनवर गर्दीच गर्दी

advt office
बातमी शेअर करा...

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली या भागांमध्ये पाऊस आणि वादळी वारे वाहू लागल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. अचानक भयानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागत असून रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. या ममुळे आता कर्मचारी व दैनिंदिन प्रवास करणाऱ्यांचे मुंबईकरांचे हाल सुरु झाले आहेत. घाटकोपर या स्टेशनवर गर्दीच गर्दी झाली आहे.

मुंलुंड आणि ठाणे या दरम्यानचा ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. जास्तच वादळी वाऱ्यामुळे खांब कोसळला. धीम्या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. घाटकोपर या स्टेशनवर प्रचंड गर्दी झाली आहे. घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो मार्गावर बॅनर कोसळल्याने ती वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती जी आता मार्गावर येते आहे. तांत्रिक अडचणही तिथे निर्माण झाली होती परंतु, आता ही वाहतूक पूर्वपदावर येते आहे. सेंट्रल रेल्वेने पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

आठवड्याचा आज पहिला दिवस आहे. त्यामुळे लाखो नागरीक आज आपापल्या ऑफिस आणि कार्यालयांमध्ये पोहचले होते. नियोजित वेळापत्रकानुसार लाखो प्रवासी सायंकाळच्या वेळेस आपले कार्यालयीन कामकाज पूर्ण करुन घराच्या दिशेला निघतात. पण ऐन गर्दीच्या वेळेस अचानक पाऊस आला. पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानक दरम्यान ओव्हरहेड वायरचा खांब कोसळला. त्यामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून लोकल ट्रेनच्या लांबच्या लांब रांगा रेल्वे रुळावर बघायला मिळाल्या. बराच वेळ झाला तरी लोकल ट्रेन सुरु न झाल्यामुळे नागरीक लोकल ट्रेनच्या खाली उतरले आणि त्यांनी रेल्वे रुळावरुन पायी जाणे पसंत केले.

ठाणे आणि मुलुंड मध्ये झालेल्या बिघाडाची मध्य रेल्वेने तातडीने दखल घेतली आहे. सदर प्रसंगी कर्मचारी पोहचले आहेत. तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ट्रेन कधी सुरु होतात आता या प्रतीक्षेत मुंबईकर आहेत.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम