मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

बातमी शेअर करा...

कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात आज म्हणजेच सोमवार दि. १३ मे रोजी दुपारपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे लोकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. डोंबिवली आणि कल्याण भागात दुपारपासून आभाळ आले होते. त्याच बरोबर वादळाला सुरुवात झाली. अर्धा-पाऊण तासाच्या वादळानंतर रिमझिम सरी बरसायला सुरुवात झाली. अंबरनाथ आणि बदलापूर भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारादेखील पडल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. सलग तीन तास आकाशात काळोख पसरला होता. त्यामुळे भर दुपारी संध्याकाळ झाल्याचा अनुभव येत होता. दुसऱ्या बाजूला या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज गुल झाली आहे. डोंबिवली, कल्याण भागात अनेक ठिकाणी वीज नसल्यामुळे लोकांच्या कामांचा खोळंबा झाला आहे.

“मी यापुढे निवडणूक लढवणार नाही”, लोकनेते एकनाथ खडसे यांची मोठी घोषणा

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सोमवारी दुपारनंतर आभाळ आले होते. त्याच बरोबर वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दुपारी दोननंतर आकाशात काळोख पसरला होता. त्यामुळे पाऊस बरसणार असल्याची चाहूल लागली होती. वातावरण पाहून अनेकांनी घराची वाट धरली. कारण या उन्हाळ्यात कोणाकडे छत्री असण्याचा प्रश्नच नव्हता. दरम्यान, दुपारी ताशी १०० किमी वेगाने वादळी वारा वाहत होता. त्यामुळे धूळ आणि कचरा लोकांच्या घरात गेला.

आचारसंहिता काळात पिंपरी-चिंचवड ग्रामीण भागात १३ कोटी ९६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

तसेच, विभागाने दिलेल्या माहितीनुसार पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासोबत अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान, अजून काही वेळ ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारा वाहत राहील. कल्याण-डोंबिवली भागात मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या. पुढील तीन ते चार तास घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन भारतीय हवामान विभागाने केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम