विदर्भात पावसाचा कहर : ४५ जण अडकले पाण्यात !

advt office
बातमी शेअर करा...

राज्यात अनेक दिवसापासून पावसाचा हाहाकार सुरु असून राज्यातील रायगड जिल्ह्यात तुफान पाऊस झाल्यानंतर दरड कोसळली होती यात आतापार्यात २२ जण दुर्देवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्यानंतर आता विदर्भात देखील पावसाचा कहर यवतमाळ जिल्ह्यात दिसला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे सुमारे 45 लोक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या नागरिकांच्या मदतीला धावून आले आहेत. आम्ही सातत्याने स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून आता तासभरात भारतीय हवाई दलाचे 2 हेलिकॉप्टर्स नागपुरात पोहोचतील आणि तेथून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लगेच महागावसाठी रवाना होतील, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे. तसेच सुमारे 231 मिमी पाऊस येथे झाला आहे. माझे सहकारी मदनभाऊ येरावार सुद्धा संपर्कात आहेत. परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत अशी माहिती देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत दिली आहे. यवतमाळच्या महागावमध्ये पुरात अडकलेल्यांची हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे सुटका केली जाणार आहे. हवामान सुधारल्यानंतर बचावकार्य सुरू होईल. यवतमाळ जिल्ह्यात घराच्या भिंती कोसळून 2 जणांचा मृत्यू झाला. तसेच पाच वेगवेगळ्या ठिकाणी एसडीआरएफकडून बचाव कार्य सुरू आहे, अशी माहिती यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम