राज ठाकरे हाजीर हो ! शिवतीर्थहून निघाले !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ जानेवारी २०२३ । राज्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना परळीच्या कोर्टाने समन्स बजावले आहेत. आज त्यांना कोर्टात सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार राज ठाकरे आपल्या मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानावरून विमानतळाकडे रवाना झाले आहेत. राज ठाकरे यांना कोर्टात 11 वाजता हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. त्यामुळे राज ठाकरे यांना आज कोर्टात हाजीर राहावे लागणार आहे.

2008 मध्ये राज ठाकरे यांना अटकेच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी परळी गंगाखेड परिसरात निषेध व्यक्त केला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली होती. त्यानंतर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात पूर्वी देखील राज ठाकरे यांना दोन वेळा वॉरंट जारी करण्यात आले होते. अखेर आज राज ठाकरे परळी कोर्टात हजर होत आहेत.
राज ठाकरे यांना 22 ऑक्टोबर 2008 रोजी अटक झाली होती. या अटकेचे राज्यभर पडसाद उमटले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी परळी तालुक्यात अनेक ठिकाणी तोडफोड केली. परळी-गंगाखेळ रोडवरच्या धर्मापुरी फाटा येथे एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक करून तोडफोड केली. या प्रकरणी परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार देण्यात आली होती.

याआधी राज ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी या सुनावणीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांना गेल्या वर्षी 6 जानेवारी 2022 रोजी अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले. त्यानंतर 10 फेब्रुवारी 2022 पर्यंत परळी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले. मात्र, याविरोधात संजय आघाव, शिवदास बिडगर, अनीस बेग, प्रल्हाद सुरवसे, राम लटपटे यांनी कोर्टात धाव घेऊन अजामीनपात्र वॉरंट रद्द केले होते. त्यानंतर राज यांना 13 एप्रिल रोजी दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट बजावले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम