‘भारत जोडो’ यात्रेचे खरे कारण आले समोर !

बातमी शेअर करा...

कन्याकुमारीपासून सुरु झालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता हिमाचल प्रदेशात दाखल झालीये. खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वात हजारो लोक भारत जोडो यात्रेत दाखल झाले आहेत. मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेली ही यात्रा सुरू करण्याचे कारण आज राहुल गांधी यांनी सांगितलं.

गांधी म्हणाले की, यात्रेपूर्वी आम्ही संसदेत मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. पण ते आम्हाला तिथे मुद्दे मांडू दिले नाहीत. भारतातील संस्था, मग ती न्यायव्यवस्था असो वा प्रेस, ते सर्व भाजप-आरएसएसच्या दबावाखाली आहेत. त्यामुळे आम्ही कन्याकुमारी येथून यात्रेला सुरुवात केली.

राहुल गांधी सातत्याने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करताना दिसत आहेत. राहुल यांच्या भारत जोडो यात्रेची मोठी चर्चा झाली आहे. लवकरच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा समारोप होणार आहे. या यात्रेत राहुल यांनी अनेक राज्यातील संस्कृती समजून घेतली.

 

दरम्यान भारत जोडो यात्रेचा समारोप ३० जानेवारीला श्रीनगरमध्ये होणार आहे. त्यानंतरचा काँग्रेसचा प्लॅन ठरला आहे. राहुल गांधी यांचे विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी काँग्रेसने योजना आखली आहे. त्यासाठी काँग्रेस २६ जानेवारीपासून मोहीम राबवणार आहे. ही मोहिम २६ मार्चपर्यंत चालणार आहे. या नव्या योजनेअंतर्गत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी द्वेष, बेरोजगारी, महागाई आणि सर्वसामान्य जनतेशी संबंधित इतर प्रश्नांबाबत पत्र लिहिले आहे. हे पत्र बुथ पातळीपर्यंत पोहचवून नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम