जिजामाता जयंती निमित्त रंग भरण स्पर्धेचे आयोजन

मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड चे मोठ्यासंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

बातमी शेअर करा...

पारोळा (प्रतिनिधी)

मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 12 रोजी सकाळी 9 वा. भुईकोट किल्लात रंग भरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या रंग भरण स्पर्धा 3 गटात घेण्यात येणार आहे. पहिला गट 5वी ते 6वी, दुसरा गट 7वी ते 10 वी, तिसरा गट 11 वी ते खुला वर्ग ठेवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी रंग व साहित्य स्वतः आणायचे आहे. स्पर्धे साठी लागणारे चित्र आयोजक पुरवणार आहेत. या स्पर्धेच्या विजेते प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक निवडून त्यास ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

पारोळा तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड चे पदाधिकाऱ्यांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम