कराडी जि प शाळेत बाल आनंद मेळावा साजरा

बातमी शेअर करा...

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील जि प प्राथमिक शाळा कराडी येथे दि. ९ रोजी “बाल आनंद मेळावा” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

मेळाव्यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक, सरपंच ,उपसरपंच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष तसेच विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी तसेच पुरुष व महिला पालक वर्ग यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात उत्साहाने सहभाग घेतला.

बाल आनंद मेळाव्यात एकूण २१ स्टॉल होते त्यात आपले पारंपारिक खाद्यपदार्थ आणले होते. या मेळाव्यात मुलांना व्यवहार ज्ञान, नफा- तोटा, फायदा- नुकसान व हिशोब ताळमेळ हे सर्व कौशल्य विद्यार्थ्यांना या मेळाव्यातून शिकण्यास मिळाले.

शाळेच्यावतीने उपस्थितांचे मुख्याध्यापक श्री.दिपक देवराम देवरे यांनी सुत्रसंचलन केले व आभार मानले. याप्रसंगी शिक्षक श्री मनोहर पाटील, प्रमोद खैरनार श्रीमती स्मिता देसले व पूजा पाटील उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम