राजपुत समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापनेला राज्यमंत्री मंडळात मान्यता प्राप्त..

डॉ संभाजीराजे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

बातमी शेअर करा...

पारोळा

येथील डॉ. संभाजीराजे पाटील हे एरंडोल पारोळा मतदार सांगतील कोणतेही सामाजिक विषय असो ते मार्गी लावण्याकरिता नेहमी अग्रेसर असतात. तसेच त्यांनी त्यांच्या मतदार संघ करिता नव्हे तर राज्यातील राजपुत समाजाचा जिव्हाळ्याचा विषय त्यांनी पाठपुरावा करून मार्गीच नव्हेतर मान्यताच मिळवून दिली.

राजपूत समाजाकरीता आर्थिक विकास महामंडळ स्थापनेसाठी डॉ. संभाजीराजे आर पाटील यांनी दि.२६ जुन २०२४ रोजी जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री तसेच कॅबिनेट मंत्री मा.ना.श्री.गुलाबराव पाटील, तसेच मदत व पुनर्वसनमंत्री मा. ना.श्री.अनिल भाईदास पाटील यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते, तसेच यानंतर देखील डॉ संभाजीराजे पाटील यांनी वेळोवेळी मंत्री महोदयांची मुंबई येथे भेट घेऊन राजपुत समाजाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी सतत पाठपुरावा केला होता, त्या प्रस्तावास २४ सप्टेंबर २०२४ रोजी राज्यमंत्रीमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे ,राजपुत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळ स्थापनेसाठी निर्णय घेण्यात आला, याबद्दल डॉ संभाजीराजे पाटील यांच्या वतीने महायुती सरकारचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

राज्यात राजपुत समाज आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय असून शेती, लघु उद्योग व व्यवसाय करून आपली उपजीविका करत असतात, महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील सर्व राजपुत समाजाला आर्थिक प्रबळता लाभणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला आज मान्यता मिळाल्याने राजपूत समाजातील अनेक पदाधिकारी यांकडून डॉ संभाजीराजे पाटील यांचे आभार मानण्यात येत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम