आता शाळेत शिकविले जाणार ‘रामायण’ आणि ‘महाभारत’
बातमीदार | २२ नोव्हेबर २०२३
‘रामायण’ आणि ‘महाभारत’ सारख्या महाकाव्यांचा सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये समावेश करण्याची आणि शाळेतील प्रत्येक वर्गाच्या भिंतीवर राज्यघटनेची प्रस्तावना लिहिण्याची शिफारस राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात एनसीईआरटीच्या एका उच्चस्तरीय समितीने केली आहे.
या समितीने अगोदरच सर्व शालेय अभ्यासक्रमांच्या पुस्तकांमध्ये इंडियाऐवजी ‘भारत’ असा उल्लेख करण्याची शिफारस केली होती. शालेय अभ्यासक्रमातील बदलासाठी एनसीईआरटीने सी. आय. इसाक यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे. गतवर्षी स्थापन करण्यात आलेल्या सात सदस्यीय समितीने सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकासाठी अनेक शिफारशी केल्या आहेत. समितीने सामाजिक शास्त्राच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना ‘रामायण’ व ‘महाभारत’ शिकवण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली आहे. किशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा स्वाभिमान, देशभक्ती शाळेत शिकवणार रामायण, महाभारत! आणि राष्ट्रावदल अभिमान निर्माण होत असतो. त्यमुळे त्यांना हे महाकाव्य शिकवण्याची गरज असल्याचे इसाक म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम