मुख्यमंत्री शिंदेंच्या मदतीला राणा दाम्पत्यांनी घेतला पुढाकार

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ ऑक्टोबर २०२२ । निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा दणका दिली आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे राखीव चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवे चिन्हाचा शोध घेत आहेत. तर दुसरीकडे शिंदे सरकारच्या मदतीला बडनेराचे आमदार रवी राणा धावून आले आहेत. रवी राणा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट मोठी ऑफर दिलीये.. गरज भासल्यास युवा स्वाभिमान पक्ष तुम्ही घ्या अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलंय. अमरावती लोकसभा मतदार संघात नवनीत राणा या पाना हे चिन्ह घेऊन निवडून लढत आल्या आहेत. सभी नटो का एक ही पाना असे रवी राणा यांना म्हटलं जाते.
आदरणीय शिंदे साहेब आपणास गरज पडल्यास माझा पक्ष माझ्या पक्षाचे चिन्ह spanner (पाना) आपल्या सोबत उभा राहील.. आपण युवा स्वाभिमान पार्टी आणि पाना चिन्ह घ्यावा …

शिंदे गट देखील या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे. तर आपल्याला तलवार चिन्ह मिळावे यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न राहणार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार सोमवारी (10 ऑक्टोबर 2022 ) दुपारी एक वाजेपर्यंत दोन्ही गटांना अपेक्षित असलेले पण आयोगाकडे उपलब्ध असलेल्या मुक्त चिन्हापैकी तीन चिन्हांचा पर्याय द्यावा लागणार आहे. शिंदे गट त्यांना पाहिजे असलेल्या तलवार या चिन्हांचा पर्याय देण्याची शक्यता आहे. निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यायचे किंवा कसे, याबाबत पक्षाच्या कायदेविषयक सल्लागारांशी चर्चा करण्यात येणार आहे. तसंच चिन्हाबाबत काय करता येईल याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल. दरम्यान आता अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचं चिन्ह गोठवण्यात आलं आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाची पुढची वाटचाल कशा प्रकारे आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम