जळगावातून रिक्षा चोरीला; गुन्हा दाखल

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ ऑक्टोबर २०२२ । शहरातील दांडेकर नगरातून ३५ हजार किमतीची रिक्षा चोरीला गेल्याची घटना दि ८ रोजी सकाळी उघडकीस आल्याने रिक्षा मालकाने शहर पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील दांडेकर नगरातील सफेद कारखाना येथील रहिवासी शेख तहजीब शेख युनुस (वय ३२)यांच्या मालकीची क्र एम.एच.१९.व्ही.८९०८ काळ्या रंगाची रिक्षा आपल्या घरा बाहेर दि ७ रोजी लावलेली असताना दि ८ रोजी सकाळी नेहमी प्रमाणे ते घराबाहेर आले असता रिक्षा आढळून न आल्याने त्यांनी लागलीच शहर पोलिसात धाव घेत अनोळखी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोना.योगेश पाटील हे करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम