राणेंचे काम झाले आता मंत्रीपद जाणार ; ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ एप्रिल २०२३ ।  राज्यात नारायण राणे व उद्धव ठाकरे यांचा वाद फार जुना असला तरी त्यांना वाद वाढविण्यासाठी अगदी शिल्लक कारणाने देखील वाढ वाढविता येण्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन पासून त्यात अजूनच भर पडली आहे. ठाकरे आणि शिंदे गटातील नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. अशातच ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी शिंदे गट , भाजप आणि राणेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

दोन ते तीन महिन्यांमध्ये नारायण राणे यांचं मंत्रीपद जाणार असल्याचं भाकीतच नाईक यांनी वर्तवलं आहे. हे भाकीत नसून वस्तुस्थिती आहे. असं देखील वैभव नाईक म्हणाले आहेत. नारायण राणे यांचं शिवसेनेवर टीका करण्याचं काम होतं. ते काम आता संपलेलं आहे त्यामुळे त्यांचं मंत्रीपद पुढील काही महिन्यांमध्ये जाणार आहे. असा दावा त्यांनी केला.

तर पुढं म्हणाले की, नारायण राणेंना माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघातून त्यांच्या मुलाला उभं करायचं आहे. मात्र जनतेचा कौल हा उद्धव ठाकरेंसोबत आहे त्यामुळे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांवर बोलताना म्हणाले, जे आमदार आमच्यातून शिंदे गटात गेले आहेत ते आमदार आमच्यात पुन्हा येण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर अनेक आमदार परत येण्यास तयार आहेत. आमच्यातून गेलेल्या आमदारांना आता त्यांची खरी परिस्थिती कळालेली आहे. असा दावा देखील त्यांनी केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम