
दै. बातमीदार | 25 जुलै 2022 | जळगाव येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे मेहरुण चौपाटीवर भजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास 570 जणांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
अध्यक्ष विपूल पारेख, मानद सचिव रविंद्र वाणी, प्रकल्प प्रमुख कल्पेश दोशी, सहसचिव दिनेश थोरात यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
पावसाची रिमझिम, तलावाकाठी निसर्गरम्य वातावरणात विविध प्रकारची भजे, साबुदाणा खिचडी व चहाचा नागरिकांनी आस्वाद घेतला. मोठ्यांनी छोटे होत बग्गीत बसून फोटो काढण्याचा आनंद घेतला.
रोटरी सेंट्रलच्या सर्व माजी अध्यक्ष व सदस्यासह शहरातील सर्व रोटरी क्लबचे आजी-माजी अध्यक्ष, डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स व विविध क्षेत्रातील मान्यवरांची कुटुबीयासह यावेळी उपस्थिती होती.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम