
राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने राष्ट्रसंत रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
भडगाव/प्रतिनिधी
राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने राष्ट्रसंत रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सुरवातीला सर्व समाज बांधव च्या वतीने आझाद चौक,संत रोहिदास वाडा येथे संत रवीदास महाराज मंदिरात पूजन व आरती करण्यात आले तसेच महाप्रसाद चे आयोजन ही करण्यात आले होते.
आशिर्वाद प्लाझा येथे संत रोहिदास महाराज याच्या प्रतिमे पूजन करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार समारंभ करण्यात आले.
तालुका अध्यक्ष रवी आहिरे यांनी समाज संघटित होणे काळची गरज असून संघटित समाज संघर्ष करून आपल्या समाज चा विकास साधू शकतो असे सांगत सर्व समाज बांधवांनी चर्मकार महासंघाच्या प्रवाहात सामील होऊन राष्ट्रीय अध्यक्ष नामदार बबनराव घोलप व राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.
तसेच भडगाव पाचोरा तालुक्याचे आमदार आप्पासो. किशोर धनसिग पाटील यांनी प्रतिमापूजन केले तसेच वृदावन हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. नीलकंठ पाटील यांनी आपल्या हॉस्पिटलचे एका वार्डला संत रवीदास महाराज यांचे नाव देण्याचे जाहीर केले.तसेच माझी सैनिक शांताराम बोरसे व दिलीप झिपरू वाघ आणि भरत पाटील यांच्या हि सत्कार करण्यात आला. तसेच भडगाव तालुका अध्यक्ष सागर महाजन, पत्रकार अशोक परदेशी, सुधाकर पाटील,संजय पवार,नरेंद्र पाटील,नितीन महाजन,सागर महाजन व इतर पत्रकार बांधव उपस्थित होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, सुनील देशमुख, सौरभ पाटील, नगरसेविका योजनाताई पाटील, कमलताई आहिरे, नायब तहसीलदार महेंद्र मोतीराय, (सिद्धिविनायक हॉस्पिटलचे चेअरमन तथा वैद्यकीय अधिकारी ) साहेबराव अहिरे.मानवराज प्रतिष्ठान चे अध्यक्ष निलेश मालपुरे चर्मकार भडगाव तालुका अध्यक्ष रवी आहिरे, उपाध्यक्ष मधुकर वाघ, युवा अध्यक्ष सुधीर बापु आहिरे, आजी माजी नगरसेवक, प्रा. तांदळे, प्रा. बाविस्कर, सुभाष नामदेव अहिरे,राजू जगन्नाथ आहिरे, मोहित आहिरे, हेमंत आहिरे महिला तालुका अध्यक्ष लताताई बापु आहिरे, सुरेखा दिलीप वाघ, दिपाली वाघ, मनीषा सोनवणे, मनिषा महेंद्र मोतीराय, पूनम सुधीर आहिरे, आदी सह समाज बांधव उपस्थित होते.
भडगाव शहरातील तहसील कार्यालय, नगरपरिषद, पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती या प्रशासकीय कार्यालयात प्रतिमा पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण महाजन सर यांनी तर आभार रवी आहिरे यांनी मानले

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम