राऊत यांची बदली; “हे” असतील जळगावचे नवीन जिल्हाधिकारी

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० सप्टेंबर २०२२ । आज (दि.३०) रोजी कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची बदली करण्यात आली असून, अमन मित्तल हे जळगावचे नवे जिल्हाधिकारी म्हणून निवडले गेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिजित राऊत हे नांदेड जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त केले गेल्याने, त्यांच्या जागी लातूरचे मनपा आयुक्त अमन मित्तल हे जळगाव जिल्हाधिकारी पदाचा पदभार सांभाळणार आहेत. प्रधान सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांचेकडून अमन मित्तल यांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

मागील काही दिवसांपासून राऊतांच्या बदलीच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र, गुरुवार (दि.२९) रोजी राज्यशासनाने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

२०१५ बॅचचे जिल्हाधिकारी असलेले अमन मित्तल यांची आतापर्यंतची कारकीर्द उत्तम आहे. त्यांनी नाशिक, कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, लातूर मनपा आयुक्त या पदांची जवाबदारी चोखरित्या पार पाडली. महापूर व कोरोनासारख्या आपत्तींच्या काळातही मित्तल यांनी आघाडीवर राहून उत्तम काम केले आहे.

अभिजित राऊत यांनीही जिल्ह्यातील कोरोना चांगल्या प्रकारे आटोक्यात आणला म्हणून त्यांचे सर्वत्र कौतुक झाले होते. जिल्ह्याला सलग दुसऱ्यांदा तरुण जिल्हाधिकारी लाभले असल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम