भाजपसह मुख्यमंत्र्यांवर राऊतांचे धक्कादायक आरोप !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३० ऑगस्ट २०२३ | शिवसेनेतून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे आता भाजप सोबत सत्तेत असल्याने त्यांच्यावर विरोधक असलेले ठाकरे गटाकडून आरोपाच्या फैरी सुरु असून आज देखील ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका शिंदेसह भाजपवर केली आहे.

संजय राऊत म्हणाले कि, लाचार मुख्यमंत्री खुर्चीवर बसवून केंद्राचा मुंबई गिळण्याचा डाव तर निती आयोगाच्या माध्यमातून मुंबईचा विकास करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार विरोध केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तर, केंद्र सरकारला हा निर्णय घेता आला नसता, असा दावाही राऊत यांनी केला आहे. या संदर्भात संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई ही महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची आर्थिक राजधानी आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला मुंबई गिळायची आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तर मुंबई गिळण्याचा हा डाव यशस्वी झाला नसता. त्यामुळे त्यांनी लाचार मुख्यमंत्री खुर्चीवर बसवला आणि आता मुंबई गिळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबईचा विकास करण्यासाठी निती आयोगाची आवश्यकता नाही. मुंबईचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र सक्षम असल्याचा दावा देखील खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एकनाथ शिंदे हे लाचार, लोचट व गुडघे टेकरणारे मुख्यमंत्री असल्याचा आरोपही त्यांनी केला. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करतानाच हा डाव रचण्यात आला होता. आणि ठरल्याप्रमाणे मुंबईची सुत्रे मोदी आणि अमित शहा यांनी घेतली असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात हा निर्णय घेता आला नसता, त्यामुळे शिवसेनेमध्ये फूट पाडून सत्ता ताब्यात घेण्यात आली असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम