रवीनाला फोटोशूट भोवणार ? ; दिल स्पष्टीकरण !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० नोव्हेबर २०२२ । रवीना टंडन सध्या वाघाच्या फोटोशूटमूळे चांगलीच अडचणीत आली असून त्यामुळे सध्या चांगलीच चर्चेत आली. नुकतचं तिनं वाघाचा एक व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचबरोबर रवीनाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर सातपुडा व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवासाचे फोटो शेअर केले आहेत. तिने वाघांचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती वाघाच्या जवळ जाताना दिसत आहे.

मात्र या व्हिडिओमूळेच तिच्या अडचणी वाढल्या आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, वन उपविभागीय अधिकारी (एसडीओ) धीरज सिंह चौहान यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सूचनेनंतर या व्हिडीओची आणि चालक आणि तेथे ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांना नोटीस देऊन त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचेही सांगितले.

 

मात्र या प्रकरणानंतर आता रविना टंडने यासर्व प्रकरणावर आता स्पष्टीकरण दिलयं. याबाबत एक ट्विट पोस्ट करत तिने याबाबत स्पष्टीकरण दिलंयं. यात ती म्हणतेय की, “काही वृत्तवाहिन्यांनी दाखवलं की आम्ही वाघिणीच्या जवळ गेलो. मात्र आम्ही वनविभागाच्या परवानाधारक गाईड आणि गाडीतून तिथे गेलो होतो. त्यांना सगळ्या सीमा माहित असतात . वाघ त्याच्या परिसरात राजासारखा फिरत असतो. आपण केवळ तिथे मूकप्रेक्षक असतो. आपली एखादीही अचानक केलेली हलचाल त्यांना विचलित करु शकते .सुदैवाने आम्ही अशी काही हलचाल केली नाही. आम्ही तिच्या वाटेला गलो नाही फक्त तिला शांतपणे पाहत राहिलो. यापुर्वीही केटी वाघिणीच्या वाहनांजवळ येण्याच्या घटना घडल्या आहेत.” आता तिने दिलेलं स्पष्टिकरण एकल्यानंतर वनविभाग काय कारवाई करेल याकडे आता लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम