उदयनराजे नाराज ? ; शिवप्रताप दिन कार्यक्रमाला अनुपस्थित !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० नोव्हेबर २०२२ । प्रतापगडावर शिवप्रताप दिनानिमित्त होणाऱ्या सोहळ्यास खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीबाबत साशंकता निर्माण झाली होती. उदयनराजे यांनी प्रतापगडावरील सोहळ्यासाठी उपस्थित राहावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशीरापर्यंत प्रयत्न केले असल्याची माहिती समोर आली होती. मात्र उदयनराजेंकडून यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला गेला नाही, अशी माहिती समोर आली आहे.

शिवप्रताप दिनानिमित्त प्रताप गडावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते उपस्थिती दर्शवणार आहेत. मात्र, खासदार उदयनराजे भोसले गैरहजर राहणार आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात नाराजीचा सूर पसरला आहे. मात्र, आज ३ डिसेंबरला रायगडावर होणाऱ्या आंदोलनाची चर्चा उदयनराजे कार्यकर्त्यांशी करणार आहेत. त्यामुळे ते प्रताप गडावर उपस्थित राहू शकणार नाहीत असे सांगण्यात आले आहे.
आज होणाऱ्या प्रतापगडावरील सोहळ्यासाठी उदयनराजे यांनी उपस्थिती लावणे, हे स्वत: मुख्यमंत्री आणि राज्य सरकारच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. उदयनराजे हे शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत. ज्या प्रतापगडावर हा सोहळा होत आहे, त्यावर उदयनराजे यांचे नियंत्रण आहे. म्हणून त्यांची उपस्थिती ही राज्यसरकारसाठी महत्त्वपूर्ण आहे. ते सहभागी व्हावेत यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रयत्न सुरू होते. मात्र उदयनराजेंनी त्याला प्रतिसाद दिलेला नाही. उदयनराजे हे साताऱ्यात आहेत, मात्र ते कार्यक्रमासाठी जाणार नाहीत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम