रावेर: सावत्र बापाने केला तीन वर्षीय मुलीचा खून, आईसह अटक

बातमी शेअर करा...

 

रावेर शहरात एका तीन वर्षीय मुलीचा तिच्या सावत्र बापाने गळा आवळून खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून मुलीची आई आणि सावत्र बापाला पोलिसांनी अटक केली आहे.

घटनेचा तपशील असा की, माधुरी घेटे आणि अजय घेटे असे अटक केलेल्यांचे नाव आहे. माधुरीचा पहिला विवाह भारत मसाने याच्याशी झाला होता आणि तिला पहिल्या पतीपासून पाच वर्षांचा मुलगा पियुष आणि तीन वर्षांची मुलगी आकांक्षा होती. पतीशी मतभेदांमुळे माधुरी दोन्ही मुलांसह बेलसवाडी येथे राहत होती. काही दिवसांपूर्वी तिने रावेर येथील अजय घेटे याच्याशी विवाह केला होता.

31 मे रोजी अजयने तीन वर्षीय सावत्र मुलगी आकांक्षा हिला दांडक्याने मारले आणि गळा आवळला, ज्यामुळे ती मयत झाली. ही घटना अजयची पत्नी माधुरीस माहित असताना तिने पुरावा नष्ट करण्याचा आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मुलीचा मृतदेह बेलसवाडी येथे नेला, पण माधुरीच्या पहिल्या पतीला याची माहिती मिळाल्यावर त्याने पोलिसांना कळवले.

पोलिसांनी मुलीला मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयात पाठवले, जिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. शवविच्छेदन केल्यावर गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले. रावेर पोलिसांनी मुलीच्या आई आणि सावत्र बापावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम