तरुणीवर स्क्रूड्रायव्हरने हल्ला, सीसीटीव्हीमध्ये कैद

बातमी शेअर करा...

अकोल्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीवर स्क्रूड्रायव्हरने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. ही घटना शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सराफा बाजारात घडली. दोन तरुणांनी माय-लेकीवर छेड काढण्याचा प्रयत्न केला, परंतु विरोध केल्यामुळे एका तरुणाने स्क्रूड्रायव्हरने हल्ला केला.

तरुणीने आरडाओरडा केल्यामुळे हल्लेखोर आणि त्याचा साथीदार घटनास्थळावरून पळून गेले. हा संपूर्ण प्रकार सराफा बाजारातील एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम