देशातील ४ बँकांवर आरबीआयची कारवाई !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ४ ऑक्टोबर २०२३

गेल्या काही वर्षापासून देशातील अनेक बँकावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून सतत काही ना काही नियम आखले जातात. बहुतांशी असे निर्णय घेतले जातात ज्यामुळं खातेधारकांना बँकींग सुविधांचा लाभ अगदी सहज पद्धतीनं घेता येईल.

वेळ पडल्यास आरबीआड डबघाईला आलेल्या बँकांना आधारही देते आणि खातेधारकांची फसवेगिरी करणाऱ्या संस्थांना शासनही घडवते. याच आरबीआयनं आता पुन्हा एकदा एक मोठा निर्णय घेत 4 बँकांवर मॉनेटरी पेनल्टी लावली आहे. आरबीआयनं ज्या बँकांना दणका दिला आहे, त्यामध्ये द सर्वोदय सहकारी बँक, धनेरा मर्केंटाइल को-ऑपरेटिव बँक , द जनता को-ऑपरेटिव बँक आणि मणिनगर को-ऑपरेटिव बँक समाविष्ट आहे. बँकेच्या संचालकपदी असणाऱ्या एका व्यक्तीच्या नातेवाईकांना कर्जासाठी मान्यता देण्यात आल्यामुळं सर्वोदय सहकारी बँकेवर मौद्रीक दंड लावण्यात आला आहे. इथं खुद्द संचालकच गॅरेंटरपदी असून, त्यांनी अंतर्गत अटींचं उल्लंघन केल्याची बाब समोर आली. तर, मणिनगर सहकारी बँकेला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. जनता सहकारी बँकेवर 3.50 लाख रुपये, धनेरा मर्केंटाईल बँकेला 6.50 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयच्या या निर्णयाचा खातेधारकांवर थेट परिणाम होणार नसल्याचं प्राथमिक स्वरुपात सांगण्यात येत आहे. त्यामुळं अनेकांनाच दिलासा मिळत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम