या सहकारी बँकेना आरबीआयने घातले निर्बंध !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ फेब्रुवारी २०२३ । प्रत्येक सामान्य व्यक्ती आपल्या व्यवसायातून जमा केलेले पैसे कुठल्याही सहकारी बँकेत ठेवत असतो कारण या बँकेत कुठल्याही प्रकारची गर्दी व तत्काळ कामे होत असतात. पण हेच तुम्हाला आता धोकादायक ठरू लागणार आहे. आरबीआयने पुन्हा एकदा सहकारी बँकेवर निर्बंध लावले आहेत. 5 को ऑपरेटिव्ह बँकांवर हे निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना पैसे काढण्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या निर्बंधांमुळे या बँका आरबीआयच्या पूर्वपरवानगीशिवाय कर्ज देऊ शकत नाहीत. या पाच सहकारी बँकांवरील निर्बंध पुढील सहा महिने कायम राहणार आहेत. कर्जदारांची बिघडलेली आर्थिक स्थिती लक्षात घेता रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी पाच सहकारी बँकांवर रोख रक्कम काढण्यासह अनेक निर्बंध लावले आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निवेदनात म्हटले आहे की या पाच सहकारी बँकांवरील निर्बंध पुढील सहा महिने सुरू राहतील. या निर्बंधांमुळे या बँका आरबीआयच्या पूर्वपरवानगीशिवाय कर्ज देऊ शकत नाहीत. CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार या बँकांना याशिवाय आरबीआयच्या परवानगीशिवाय कोणतीही गुंतवणूक करता येणार नाही. संपत्ती ट्रान्सफर किंवा त्या संदर्भातील कामं करु शकणार नाहीत.

या पाच बँकांमध्ये HCBL सहकारी बँक, लखनऊ, आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद आणि कर्नाटकातील शिमशा सहकारी बँक नियामिथा, मद्दूर, मंड्या जिल्ह्यातील ग्राहक सध्याच्या तरलतेच्या संकटामुळे त्यांच्या खात्यातून पैसे काढू शकत नाहीत.उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा, (आंध्र प्रदेश) आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, अकलूज (महाराष्ट्र) चे ग्राहक 5,000 रुपयांपर्यंत पैसे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम