‘सेल्फी’बाबत कंगनाने उडवली करण जोहरची खिल्ली

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ फेब्रुवारी २०२३ । गेल्या काही दिवसापासून चर्चेत आलेला चित्रपट म्हणजे ‘सेल्फी’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार काम करीत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सिनेमाला प्रेक्षकांकडून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. अक्षय कुमार याच्यासाठी 2022 हे वर्ष काही खास गेले नाही. पण नव्या वर्षातील पहिला सिनेमा देखील अपयशी ठरल्यानंतर सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत. सिनेमा अपयशी ठरल्यानंरत अभिनेत्री कंगना रनौत हिने दिग्दर्शक करण जोहर याच्यावर निशाणा साधला आहे.

कंगना हिने इन्स्टाग्रामवर दिग्दर्शक करण जोहर निर्मित ‘सेल्फी’ सिनेमाला फ्लॉप ठरवलं आहे. अक्षय कुमार आणि इमरान हाशमी मुख्य भूमिकेत असलेल्या ‘सेल्फी’ सिनेमाचं दिग्दर्शन राज मेहता यांनी केलं आहे. तर दुसरीकडे बॉक्स ऑफिसच्या एका रिपोर्टमध्ये कंगनाची अक्षय कुमारसोबत तुलना करण्यात आला. यावर प्रतिक्रिया देत कंगनाने करण जोहरची खिल्ली उडवली आहे.

Kangana Ranaut takes dig at Karan Johar over 'Selfiee' first day box office  numbers – ThePrint – ANIFeed

 

इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत कंगना म्हणाली, ‘करण जोहरच्या सेल्फी सिनेमाने पहिल्या दिवशी फक्त १० लाख रुपयांचा गल्ला जमा केला आहे. यावर एकाही ट्रेड विश्लेषक आणि मीडियाने खुलासा केलेला नाही. ज्याप्रमाणे मला त्रास देतात, त्यांची खिल्ली उडवण्यास किंवा धमकावण्यास विसरले असतील…’ पुढच्या पोस्टमध्ये कंगना एक आर्टिकल शेअर केला आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या आर्टिकलचं टायटल “कंगना रनौत का मेल वर्जन!’ असं आहे. यावर कंगना म्हणाली, ‘मी सेल्फी फ्लॉप झाला अशी बातमी शोधत होती. पण पाहिलं तर प्रत्येक बातमी माझ्यावर आहे… आता ही देखील माझी चूक आहे का…’ पुढे कंगना म्हणाली, ‘वाह भाई करण जोहर’ सध्या कंगनाची पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे. ‘सेल्फी सिनेमाला अपयश मिळाल्यामुळे सर्वत्र अक्षय सर आणि मला दोषी ठरवत आहेत. सर्वत्र आमच्यावर आर्टिकल आहेत. कोणत्याही आर्टिकलमध्ये करण जोहरचं नाव नाही…’ असं म्हणत कंगनाने पुन्हा करण जोहर याच्यावर निशाना साधला आहे.

सांगायचं झालं तर, ‘सेल्फी’ सिनेमा मल्याळम सिनेमा ‘ड्रायव्हिंग लायसन्स’चा हिंदी रिमेक आहे. पृथ्वीराज आणि सूरज वेंजारामूडू यांनी ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. तर सिनेमाचा रिमेक ‘सेल्फी’ मध्ये अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत चाहत्यांच्या भेटीस आले. आता येणाऱ्या दिवसांत सिनेमा किती रुपयांचा गल्ला जमा करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम