लोणार बस स्टेशन वर लाल परी चा जन्म दीन उत्सवात साजरा

बातमी शेअर करा...

दैनिक बातमीदार । ०६ जुन २०२२ । लोणार येथे आज दिनांक १ जून २०२२ रोजी .महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून एसटीला ओळखले जाते. राज्याच्या कानाकोप-यात असलेल्या प्रत्येक गावात जाण्यासाठी लालपरी ही प्रत्येतकाला हक्काची वाटते. याच लालपरीला आज १ जून रोजी ७४ वर्ष पूर्ण झालेअसून ती अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने १ जून २०२२ रोजी एसटीचा वर्धापन दिन संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जात आहे.

लोणार बस स्टेशन वर वर्धापन दिन साजरा करण्यात आला असून या वेळी वाहतूक नियत्रक लोणार सुनील राठोड, मदन सोनूने , तर रा.स.प.चे युवक शहर अध्यक्ष तानाजी मापारी, NSUI जिल्हा सरचिटणीस शेख जुनेद भाई , इरफान खान इद्रिस खान, वाहन चालक उधव घोडके, इरत अनेक प्रवासी व एस्टी महा मंडळ चे कर्मचारी यावेळी उपस्थीत होते.

१ जून १९४८ रोजी पुणे ते अहमदनगर या मार्गावर एसटी महामंडळाची सर्वात पहिली बस धावली होती. तेव्हापासून एसटीच्या लालपरीचा हा यशस्वी प्रवास अविरत चालू आहे. त्यामुळे दरवर्षी 1 जून रोजी एसटीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे या वर्षी एसटीचे ७५व्या वर्षात पदार्पण झाल्याने राज्यातील सर्व आगारांमध्ये एसटीचा वाढदिवस साजरा करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम