विद्यार्थ्यांना दिलासा : महाज्योतीने केल्या परीक्षेच्या तारखेत बदल !
बातमीदार | २४ ऑक्टोबर २०२३
राज्य शासनाच्या नगरपरिषद संचालनालयातील वेगवेगळ्या विविध पदांच्या परीक्षा येत्या २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी आहे. तसेच याच दिवशी महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची ( महाज्योती) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) छाननी परीक्षा देखील असल्याने विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत होती. मात्र, यावर महाज्योतीने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. ज्या विद्यार्थ्यांची या दिवशी नगरपरिषदेची परीक्षा असेल तर त्यांना महाज्योतीच्या वतीने २७ आणि २८ ऑक्टोबर या दोन दिवशी परीक्षेची संधी देण्यात येणार आहे, असे महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
नगरपरिषद संचालनालयातील कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी गट-अ आणि महाराष्ट्र नगरपरिषद स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-क तसेच नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक सेवा गट-अ साठीच्या परीक्षा या येत्या २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी होत आहे. त्याचबरोबर एमपीएससीची छाननी परीक्षा महाज्योतीने त्याचदिवशी जाहीर केली होती. या दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यामुळे मोठी अडचण झाली होती. राज्यभरातील विद्यार्थ्यांनी परीक्षा देता यावी, याकरिता परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल करून मिळण्याबाबतची विनंती महाज्योती प्रशासनाकडे केली होती. या मागणीचा विचार यावर महाज्योतीनेच तोडगा काढत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. तसेच, २९ तारखेला दोन्ही परीक्षा येत असतील अशा विद्यार्थ्यांना आधी किंवा २९ तारखेनंतर वेगळी परीक्षा घेण्यात येईल, असे महाज्योतीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम