आरक्षण शिकू देत नाही ; तरुणाने लिहले मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ११ ऑक्टोबर २०२३

राज्यात गेल्या महिन्याभरापासून मनोज जरांगे पाटील आंदोलनाला बसले होते त्यानंतर ते आता राज्यभर दौरे करीत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी राज्यभरात साखळी आंदोलने सुरू आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणावर तोडगा काढावा, अशी मागणी मराठा आंदोलकांकडून केली जात आहे. अशातच राज्यातील जालना जिल्ह्यातील एका तरुणाने मराठा आरक्षणावरुन थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या रक्ताने पत्र लिहलं आहे.

दुष्काळ जगू देत नाही आणि आरक्षण शिकू देत नाही, अशी कैफियत या तरुणाने पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे. हर्षल मोतीराम फदाट, असं पत्र लिहणाऱ्या मराठा तरुणाचं नाव आहे. हर्षल हा जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातल्या बोरगाव फदाट गावचा रहिवासी आहे. मनोज जरांगे यांची आरक्षणाची मागणी पूर्ण करावी, संघर्ष हा आमच्या रक्तातच आहे. असं देखील हर्षलने आपल्या पत्रात म्हटलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांची 14 ऑक्टोबरला जालना येथील अंतरवाली सराटी गावात जाहीर सभा होणार आहे.

या सभेला निमंत्रण देण्यासाठी मनोज जरांगे हे राज्यभरातील मराठा बांधवांची भेट घेत आहे. आपल्या आरक्षणाच्या हक्काच्या मागण्यासाठी मराठा समाजाचा आवाज सरकार पर्यंत पोहचवण्यासाठी प्रत्येकाने 14 तारखेच्या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन मनोज जरांगे यांच्याकडून केलं जात आहे. दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. असे असतानाही मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन राज्य सरकार उपोषण करणाऱ्या विविध आंदोलकांना देत आहे. हे आश्वासन सरकार कशाच्या आधारे देत आहे? असा प्रश्न करणारी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम