सुषमा अंधार्रेंचा थेट फडणवीसांवर गंभीर आरोप !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ११ ऑक्टोबर २०२३

राज्यात अनेक महिन्यापासून सुरु असलेले गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढ होत असतांना विरोधक सरकारवर चांगलीच टीका करीत आहे. नुकतेच पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या पलायनामागे शिंदे गटाचा एक मंत्री व नाशिकमधील एक स्थानिक आमदाराचा हात असल्याचा आरोप काँग्रेस व ठाकरे गटाने केला आहे. ललित पाटीलला रुग्णालयात दाखल करून घ्या, यासाठी मंत्री दादा भुसेंनी रुग्णालयाला फोन केला होता, असा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. आज सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावरुन पत्रकार परिषद घेत थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला.

राज्यातील ड्रग्ज रॅकेटवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का आहेत? ड्रग माफिया ललित पाटील एवढ्या शांतपणे रुग्णालयातून चालत जातो, हे गृहविभागाचे अपयश नाही का? फडणवीस याची चौकशी करणार की नाही?, अशी प्रश्नांची सरबत्तीच सुषमा अंधारेंनी केली. तसेच, गृहखातेच आता अस्थिर झाले असून आपणच या प्रकरणी लवकरच पुरावे समोर आणणार, असा इशाराही सुषमा अंधारे यांनी दिला.

यावर पत्रकार परिषदेत भाष्य करताना सुषमा अंधारे म्हणाले, मी आरोप केला तर त्यात एवढे काय वाटून घ्यायचे. मी कोणताही आरोप वरवर करत नाही. मी जे काही बोलले त्यासंदर्भात माझ्याकडे पुरावे आहेत. हे पुरावे मी लवकरच समोर आणेल. ड्रग माफिया रुग्णालयातून कसा फरार झाला, हे आपण पाहिले आहे. तो पळून गेला नाही तर शांतपणे चालत रुग्णालयाबाहेर आला व त्यानंतर एका हॉटेलात गेला. हे कसे शक्य आहे? याचा तपास झाला पाहिजे, असे फडणवीसांना वाटत नाही का? राज्यातील एक मंत्र्यांचे एका ड्रग्ज माफियाचे संबंध असल्याचे समोर येत आहे. आपल्याकडे पुरावे आहेत. काँग्रेसचे नाना पटोले, रवींद्र धंगेकर यांनीही तसे आरोप केले आहेत. कुणीही उगाच असे आरोप का करेल?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम