पवारांच्या निवृत्तीनंतर दोन जिल्हाध्यक्षांचे राजीनामे !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ मे २०२३ ।  देशातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्यांच्या पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आता राजीनामा सत्र सुरु केल्याने पक्षात मोठा भूकंप आला आहे. यानंतर नव्या अध्यक्षांच्या निवडीसाठी एक समितीही गठीत करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. तसेच या समितीमध्ये कोण सदस्य असतील याची संभाव्य नावंही त्यांनी आपल्या भाषणातच जाहीर केली.

शरद पवारांच्या या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी टाहो फोडला आहे. निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती कार्यकर्ते करीत आहेत. दरम्यान पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष नाजेर काझी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच धाराशिवचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनीही आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर राज्यभर राजीनामा मोहीम सुरु होण्याची शक्यता आहे.

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के. के. शर्मा, पी. सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन या संभाव्य लोकांचा समावेश करण्याची सूचना शरद पवार यांनी केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम