ऋतुराज व केदार आमनेसामने ; एमपीएलला सुरुवात !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ जून २०२३ ।  देशात गेल्या काही वर्षात प्रीमियम लीग मोठ्या प्रमाणात खेळवली जात असते. यात आता महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. एमसीएच्या पुण्यातील स्टेडियमवर पुणेरी बाप्पा आणि कोल्हापूर टस्कर्स या लढतीने स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. पुण्याचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करत आहे तर कोल्हापूर संघाची धुरा केदार जाधव याच्या खांद्यावर आहे. सहा संघ 14 दिवस लढणार आहेत.. 19 सामन्यानंतर एमपीएलचा विजेता मिळणार आहे

पुणेरी बाप्पा, कोल्हापूर टस्कर्स, ईगल नाशिक टायटन्स, छत्रपती संभाजी किंग्ज, रत्नागिरी जेट्स आणि सोलापूर रॉयल्स हे सहा संघ साखळी (लीग फॉरमॅट) पद्धतीने एकमेकांशी झुंजणार आहेत. 29 जून रोजी स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने पुण्याजवळील गहुंजे येथील एमसीएच्या स्टेडियमवर खेळविले जाणार असून दुपारी 2 व रात्री 8 वाजता सामने होणार आहेत. स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी सर्व प्रेक्षकांना विनामूल्य मुक्त प्रवेश असून टेलिव्हिजनवरून दूरदर्शन डीडी वाहिनीवर, तसेच फॅनोड या स्ट्रीमिंगवरूनही हे सामने पाहता येणार आहेत.

ऋतुराज गायकवाडचा पुणेरी बाप्पा आणि केदार जाधवचा कोल्हापूर टस्कर्स या संघांमध्ये आज रात्री 8 वाजता उद्घाटनाची लढत रंगणार आहे. अनुभवी नौशाद शेख व अंकित बावणेसह सचिन धस, साहिल औताडे असे युवा खेळाडू असलेल्या कोल्हापूर संघासमोर संतोष जेधे यांचे मार्गदर्शन लाभलल्या पुणे संघाचे आव्हान असणार आहे. पुणे संघात ऋतुराजसह यष्टिरक्षक सूरज शिंदे, पवन शाह, यश क्षीरगासर व अष्टपैलू रोहन दामले यांचा समावेश आहे. पहिल्या सामन्यापूर्वी दुपारी 5.30 वाजता शानदार उद्घाटन सोहळ्याने स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या सोहळ्यात अमृता खानविलकरसह अनेक तारे-तारकांचा समावेश आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम