
दै. बातमीदार । २३ ऑगस्ट २०२२ । जळगाव येथील राेटरॅक्ट क्लब ऑफ जळगाव वेस्टचे मायादेवी नगरात रोटरी भवन येथे पदग्रहण उत्साहात झाले. यावेळी निधी कोठारी यांनी अध्यक्षपदाची व प्रतिक वाणी यांनी सचिव पदाची सूत्रे स्विकारली.
सोहळ्यास रोटरीचे माजी सहप्रांतपाल डॉ. राजेश पाटील व रोटरी जळगाव वेस्टचे अध्यक्ष सुनील सुखवाणी यांनी प्रमुख उपस्थिती होती. जागृती भागवानी यांनी कार्य अहवाल सादर केला.
युट्युब चॅनेल ला सब्सक्राइब करा
www.youtube.com/channel/UCmsDeG1dRlBB4PL1Pg_SbTQ
या सोहळ्यात २०२२-२३ ची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. त्यात सार्जंट ॲट ऑर्म्स वेदांत खाचणे, कोषाध्यक्ष गौरव देशमुख तर संचालक म्हणून विष्णू वर्मा, धीरज फटागंळे, अल्फाज पटेल, ऋषीकेश रावेरकर यांचा समावेश आहे.
कार्यक्रमास रोटरी वेस्टचे योगेश भोळे, हकीम बुटवाला, अमित चांदीवाल, देवेश कोठारी, गौरव सफळे, सचिन वर्मा, सरिता खाचणे, शंतनू अग्रवाल, ॲड. सुरज जहाँगीर, विजय शामनानी यांच्यासह १९ रोटरॉक्टर्सची उपस्थित होती.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम