रोटरी वेस्टचे संदिप काबरा यांना रोटरी डिस्ट्रीक्ट तर्फे एडुल्जी पुरस्कार

बातमी शेअर करा...

दैनिक बातमीदार | 22 मे 2022 | जळगाव येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचे माजी अध्यक्ष संदीप काबरा यांचा रोटरी डिस्ट्रीक्ट 3030 तर्फे “एडुल्जी अवार्ड फॉर एक्सलन्स” या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी त्यांच्या पत्नी व रोटरी वेस्टच्या सदस्या सपना काबरा उपस्थित होत्या.

नुकत्याच झालेल्या जीवन जश्न या रोटरीच्या परिषदेत त्यांचा प्रांतपाल रमेश मेहर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. संदीप काबरा यांनी रोटरीत केलेल्या उल्लेखनीय कार्य व रोटरी फाऊंडेशनला दिलेल्या देणगी याबद्दल त्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे.

रोटरी क्लब जळगावचे माजी अध्यक्ष व उद्योजक स्व.डॉ. किशन काबरा यांचे ते सुपुत्र आहेत. त्यांच्या गौरवाबद्दल अध्यक्ष कृष्णकुमार वाणी, मानद सचिव अनुप असावा आणि सर्व माजी अध्यक्ष व रोटरी वेस्टच्या सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम