देशात ४२ टक्क्यांनी रुपयाची झाली घसरण

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ ऑक्टोबर २०२२ ।  नरेंद्र मोदी २०१४ ला ज्यावेळी पंतप्रधान झाले त्यावेळी आरबीआयच्या आकडेवारीनुसार डॉलरच्या तुलनेत रुपया ५८.५८ या स्थानावर होता. परंतु आज २०२२ मध्ये डॉलर ८३.१२ या नीचांकी स्थानावर पोहोचला आहे.स्वातंत्र्यानंतरचा हा सर्वात मोठा नीचांक आहे असे मानले जात आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी काही दिवसांपुर्वी ‘रूपया कमजोर होत नसून डॉलर मजबूत होत आहे,’ असे वक्तव्य केले होते. त्यावेळी विरोधकांनी भाजपवर कडाडून टीका केली होती. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरण्याचं महत्वाचं कारण म्हणजे परदेशी गुंतवणुकदार मोठ्या प्रमाणवर भारतातील गुंतवणुक काढून घेत आहेत. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी गेल्या सहा महिन्यांत भारतातून सुमारे 2,320 अब्ज रुपये काढले आहेत. परकीय गुंतवणूकदारांचे पैसे काढून घेणे हे भारतात गुंतवणूक करणे सुरक्षित नसल्याचे लक्षण मानले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम