सबाने साजरी केली हृतिकसोबत दिवाळी

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ ऑक्टोबर २०२२ । दिवाळी हा सन सर्वत मोठ्या थाटात होत आहे, तर काही सिनेअभिनेत्यांनीही दिवाळी आपल्या घरी साजरी केली असून हृतिक रोशनची ही दिवाळी खूप खास ठरली आहे. यावर्षी अभिनेत्याने त्याची गर्लफ्रेंड सबा आझादसोबत दिवाळी साजरी केली. 24 ऑक्टोबर रोजी सबाने तिच्या सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री हृतिकच्या घरी दिवाळी साजरी करताना दिसत आहे. फोटोमध्ये हे कपल पांढऱ्या रंगाच्या एथनिक आउटफिटमध्ये दिसत आहे. दोघांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

सबाने हृतिकसोबतचा एक अतिशय क्युट सेल्फी पोस्ट केला आहे. ज्यामध्ये दोघेही पांढऱ्या पोशाखात हसताना दिसत आहेत. याशिवाय सबाच्या फोटोत हृतिकची भाची सुरानिका सोनीही दिसत आहे. फोटोच्या माध्यमातून सबाने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सबाने हृतिकच्या घरी लावलेल्या दिव्यांचाही फोटो शेअर केला आहे. हा फोटो हृतिकच्या भाचीने क्लिक केला होता, ज्यासाठी अभिनेत्रीने तिचे आभार मानले आहेत. सुरनिकाने सोशल मीडियावर सर्वांसोबत दिवाळीचे फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सबा व्यतिरिक्त हृतिकची चुलत बहीण पश्मिना रोशन आणि मुले हृदान आणि ह्रेहान रोशन देखील दिसत आहेत.

दिवाळीपूर्वीही सबा आणि हृतिक एकत्र स्पॉट झाले होते. अलीकडेच रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या रिसेप्शनमध्ये हे जोडपे एकत्र दिसले. परंतु त्यावेळी तिच्या आउटफिटबद्दल ट्रोल झाली होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ही जोडी पहिल्यांदा एकत्र दिसली होती, त्यानंतर त्यांच्या डेटींगच्या बातम्या खूप चर्चेत होत्या.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम