उद्या सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती पुतळ्याचं होणार अनावरण !
बातमीदार | ३१ ऑक्टोबर २०२३
देशभरातील क्रिकेटप्रेमीसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकर याच्या शिरपेचात आणखी एक मानाची तुरा रोवला जााणार आहे. मुंबईमधील वानखेडे स्टेडियममध्ये सचिनच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण बुधवार 1 नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. नवीन खेळाडूंना त्याच्याकडे पाहून प्रेरणा मिळण्याच्या उद्देशाने हा पुतळा उभारण्यात येणार आहे.
वानखेडेच्या ‘एमसीए’ लाउंजमध्ये हा सोहळा होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सचिनच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाला बीसीसीआयचे सचिव जय शाह, बीसीसीआय कोषाध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. सचिनने या मैदानावर अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
सचिनच्या पुतळ्याची १० फूट उंची तर हातामधील बॅट ४ फूट, त्याखाली संपूर्ण जग म्हणून बॉल आहे. सचिनचं संपूर्ण नाव त्यावर लिहिण्यात आलं आहे. त्यासोबतच त्याचे काही रेकॉर्डही असणार आहेत. असे एकूण २२ फूट उंची संपूर्ण पुतळ्याची असणार आहे. सचिनचा पुतळा तयार करण्यासाठी त्याची कोणती पोझ घ्यायची यावर बरीच चर्चा झालेली. अखेर सचिनची एक सिक्स मारतानाची पोझ निश्चित केली गेली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नगरचे चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी ही कलाकृती साकारली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम