उद्यापासून तुमचे बजेट बिघडणार ; कशात होणार वाढ ?

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३१ ऑक्टोबर २०२३
देशात गेल्या काही वर्षापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आज ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा दिवस असून उद्या नोव्हेंबर महिन्याला सुरुवात होईल. नोव्हेंबर महिन्यात तुमचं बजेट बिघडण्याची शक्यता आहे. 1 नोव्हेंबरपासून काही आर्थिक नियमांमध्ये बदल होणार असून त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. यामुळे तुमचं बजेट कोलमडू शकतं. 1 नोव्हेंबरपासून कोणते नियम बदलणार आहेत आणि त्याचा परिणाम तुमच्या खिशावर कसा होईल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

नोव्हेंबर महिन्यात दिवाळी आणि छट पूजा हे सण आहेत, अशात आधीच खर्च वाढणार असताना अनेक आर्थिक बदलल्याने त्याचा थेट परिणाम तुमच्या बजेटवर होणार आहे. 1 नोव्हेंबरला एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल होऊ शकतो, त्याशिवाय जीएसटी ई-चलान यासह इतरी काही नियम बदलणार आहेत.
व्यावसायिक आणि घरगुती सिलेंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला जाहीर केल्या जातात. सरकारी पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतीत बदल करतात. पाच राज्यांतील निवडणुका लक्षात घेता, नोव्हेंबरमध्ये घरगुती सिलिंडरच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे. याशिवाय सीएनजीचे दरही अपडेट होण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम