संत तुकारामांना पत्नी दररोज मारहाण करायचे ; धीरेंद्र कृष्ण शास्त्रीचे वादग्रस्त विधान

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ जानेवारी २०२३ ।नागपूर येथे झालेल्या बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या प्रवचनात अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या आव्हानामुळे चर्चेत आलेत. या बागेश्वर बाबांनी आता जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. त्यांचा यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे.

संत तुकारामांना त्यांच्या पत्नी दररोज मारहाण करत होत्या. त्यामुळे त्यांनी देवाचा धावा केला, अशी मुक्ताफळे त्यांनी या व्हिडिओत उधळली आहेत. त्यांच्या या विधानावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बागेश्वर बाबांच्या विधानाचा निषेध केला आहे. तसेच भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनीही या प्रकरणी माफीची मागणी केली आहे.

पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री आपल्या व्हिडिओत म्हणतात – ‘संत तुकाराम महाराष्ट्रातील एक संत होते. त्यांची पत्नी त्यांना दररोज काठीने मारहाण करत होती. एका व्यक्तीने त्यांना याविषयी विचारणा केली. तुम्ही दररोज बायकोचा मार खाता, तुम्हाला त्याची लाज वाटत नाही का?, असे तो म्हणाला. त्यावर तुकाराम त्या ग्रहस्थाला म्हणाले, मला मारहाण करणारी बायको मिळाली ही देवाचीच कृपा आहे.’ धीरेंद्र कृष्ण शास्त्री पुढे म्हणाले की, ‘त्यावर ती व्यक्ती म्हणाली, यात देवाची कृपा काय? तेव्हा तुकाराम म्हणाले, अरे वा! प्रेम करणारी पत्नी मिळाली असती, तर मी देवाच्या प्रेमात पडलोच नसतो. भक्तीत लीन झालोच नसतो. पत्नीच्याच प्रेमात पडलो असतो. मारहाण करणारी पत्नी मिळाल्यानेच मला देवाची सेवा करण्याची संधी मिळाली.’

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम