सलमान आला अन पूजा रडायला लागली ; काय झाल ‘बिग बॉस’ मध्ये

बातमी शेअर करा...

बातमीदार | ६ ऑगस्ट २०२३  | गेल्या काही दिवसापासून छोट्या पडद्यावरचा सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून ‘बिग बॉस’ ची ओळख आहे. सध्या ‘बिग बॉसचा ओटीटी सीझन 2’ सुरु आहे. हा शो खूपच लोकप्रिय ठरला असून यातील प्रेक्षक घराघरात लोकप्रिय झाले आहेत. या शनिवारी रविवारी बिग बॉसच्या या सीझनच शेवटचं ‘वीकेंड का वार’ पार पडणार आहे. गेल्या एपिसोडमध्ये सलमान खानने अनेक स्पर्धकांची शाळा घेतली होती. पण यादरम्यान पूजा भट्ट खूपच भावूक झाली आणि सलमानसोबत बोलताना ढसाढसा रडली. काय घडलं नक्की जाणून घ्या.’शनिवार का वार’ मध्ये पूजा भट्ट घरातील सदस्यांवर खूप रागावलेली दिसत होती. बिग बॉसच्या घरात राडे करणाऱ्या सर्व स्पर्धकांवर चिखलफेक करण्याचे टास्क दिलं गेलं.

जेव्हा ती हे काम करण्यासाठी गेली तेव्हा तिने ‘छोटे लोग छोटी सोच’ म्हणत अभिषेक मल्हान आणि इतर कुटुंबीयांवर राग काढला. तिला स्वतःवरच चिखल टाकायचा आहे असेही सांगितले.पुजा भट्टने ‘छोटे लोग छोटे सोच’ असं म्हटल्यामुळे अभिषेक मल्हान चिडला. बिग बॉसच्या सांगण्यावरून पूजाने जिया शंकरला टास्कसाठी बोलावलं, पण नंतर तिचा विचार बदलला आणि बिग बॉसने तिला टास्क न करण्याची परवानगी दिली. या गोंधळानंतर बाबिकाने देखील टास्क करण्यास नकार दिला आणि शेवटी टास्क रद्द करण्यात आला.

यानंतर वीकेंड का वार सुरू झाला ज्यात सलमाननं याच कारणावरून स्पर्धकांना खडसावलं.’तिच्या हृदयात दोन छिद्र…’ बिपाशा बसूच्या तीन महिन्याच्या लेकीची आयुष्याशी झुंज; अभिनेत्रीला कोसळलं रडूटास्क रद्द करण्यासाठी सलमान खानने बाबिकाला जबाबदार धरलं आणि तिला चांगलंच फटकारलं. पुढे सलमानच्या टार्गेटवर अभिषेक मल्हान होता, ज्याची त्याने चांगलीच शाळा घेतली. त्यानंतर भाईजानची नजर पूजावर पडली, जी थोडी उदास दिसत होती. सलमानने तिला काही झालंय का असं विचारलं. सलमानचं बोलणं ऐकताच पूजा रडायला लागली.रडतच पूजा म्हणाली, “या परिस्थितीमुळे मी खूप दु:खी आहे. त्याच्या वागण्याची पातळी खूप घसरली आहे. तो खूपच वाईट वागलाहे. या वयात आपण असे होतो असे मला वाटत नाही.

अजूनही वाटतं की आपण काहीच मिळवलं नाही.”पूजा पुढे म्हणाली, “आपल्याला एकमेकांच्या कामाबद्दल आदर होता. आपण खुलेपणाने भांडायचो, एकमेकांवर प्रेम करायचो, आपल्या चुकांची जबाबदारी घ्यायचो. पण हे तरूण आहेत, इंफ्लुएंसर्स आहेत. हे दुःखद आहे आणि मग असे वाईट शब्द वापरले जातात. माणुसकी ही वाईट गोष्ट नाही का? ” असं ती म्हणाली.सलमान खान देखील पूजा भट्टच्या बोलण्याशी सहमत झाला आणि नंतर ‘अशा लोकांनी या देशात राहू नये’ असं सलमान म्हणाला . शोमध्ये भावूक झाल्यामुळे पूजाला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. लोक तिला नाटकी म्हणत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम