म्हणून मी निर्णय घेतला ; अजित पवारांनी शहांसमोर सांगितले कारण !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ६ ऑगस्ट २०२३ | आज सहकार विभागाच्या ‘डिजिटल पोर्टल’ च्या शुभारंग सोहळ्याला सुरूवात झाली असून यावेळी व्यासपीठावर केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांसोबत, केंद्रीय सहकार राज्यमंत्री एल.वर्मा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महाराष्ट्राचे सहकार दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी नेते उपस्थित आहेत.

अजित पवार म्हणाले की, ‘शाहू, फुलेंच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं भलं फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहाच करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीत सुट्टी न घेता सीमेवर असतात, असंही अजित पवार म्हणाले आहेत. पुण्यातील रामकृष्ण मोरे सभागृहात सहकार क्षेत्राच्या वेबपोर्टलच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. तर आज कार्यक्रमात बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह फक्त हे दोघेच देशाचं नेतृत्व करू शकतात. त्यामुळे मी मोठा निर्णय घेतल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले आहेत’.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम