दै. बातमीदार । २६ ऑक्टोबर २०२२ । सलमान खान राहत असलेल्या अपार्टमेंटची मुंबई महापालिकेकडून पाहणी करण्यात आली. लेक्सी अपार्टमेंटच्या अडगळीच्या ठिकाणी डेंग्युच्या अळ्या सापडल्या आहेत. तरी पालिकेकडून या जागांसह संपूर्ण गॅलेक्सी अपार्टमेंटचं निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. बिग बॉस १६ च्या या आठवड्याच्या वीकेंड धमाक्यात होस्ट सलमान खान दिसणार नसल्याचे समजतेय. ऐन दिवाळीच्या तोंडावर सलमानला डेंग्यूची लागण झाली असून तो अजूनही रिकव्हर होत आहे.
सलमान खानच्या घरात डेंग्युच्या अळ्या सापडल्या नसल्या तरी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये डेंग्युच्या अळ्या सापडल्याने सलमानला डेंग्युची लागण झाली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. संबंधीत माहिती फ्रीप्रेस जर्नलच्या वृत्ताकडून प्रसारित करण्यात आली आहे. बीएमसी कीटकनाशक विभागाचे अधिकारी राजेंद्र नारिंग्रेकर यांनी खुद्द अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची सखोल पाहणी केल्यानंतर याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
गॅलेक्सी परिसरामध्ये दोन ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. पण खान यांच्या घरी अळ्या सापडल्या नाहीत. तसेच डेंग्युच्या अळ्या सापडल्यास बीएमसी सोसायट्यांना नोटीस पाठवत नाही त्याऐवजी आम्ही घरमालकांना त्यांच्या घरात अळ्या आढळल्यास नोटीस पाठवतो, अशी माहिती राजेंद्र नारिंग्रेकर यांनी दिली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम