शाकालच्या दगडूने लावले दिवाळीत ‘हिच्या’सोबत दिवे

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ ऑक्टोबर २०२२ । राज्यात ‘टाइमपास’ या चित्रपटातून अल्पावधीतच घराघरात पोहोचलेला महाराष्ट्राचा लाडका दगडू अर्थात अभिनेता प्रथमेश परब यंदा दिवाळीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये त्याच्यासोबत एक गोड मुलगी देखील आहे. प्रथमेशने आजवर त्यांच्या खासगी आयुषयाविषयी बरच काही सांगितलं आहे पण त्याची प्रेयसी कोण ही त्याने सांगितलेले नाही. पण या फोटोंवरून मात्र प्रथमेश परब रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे.

अभिनेता प्रथमेश परब याने आजवर बालक पालक, टाइमपास, टकाटक असे अनेक सिनेमे केले पण प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला तो ‘टाइमपास’ मधला दगडू. नुकताच या चित्रपटाचा तिसरा भाग येऊन गेला, ज्यामध्ये दगडू आणि प्राजक्ता नाही तर पालवीची लव्हस्टोरी दाखवण्यात आली होती. पण दगडूची खरी प्राजक्ता कोण असा प्रश्न त्याला वारंवार विचारला गेला आहे, आणि त्यावर त्याने उत्तरदेणेही टाळले आहे.पण यंदाच्या दिवाळीत मात्र दगडूची प्राजक्ता सर्वांसमोर आली आहे. प्रथमेशने त्यांची मैत्रीण क्षितिजा घोसाळकर सोबत काही फोटो शेयर केले आहेत. ती टाइमपास 3 च्या प्रीमियरला देखील हजर होती. त्यावरून ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम