२५ वर्षाने लहान अभिनेत्रीच्या रिलेशनमध्ये अडकला सलमान खान ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ एप्रिल २०२३ । अनेक चित्रपट प्रेक्षकांना नेहमीचा पडलेला प्रश्न म्हणजे बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आतापर्यत लग्न का नाही करत याबाबत त्याने अनेक ठिकाणी वेगवेगळे कारण दिले आहे. पण आता तो वेगळ्याच चर्चेत सापडला आहे. सलमान खान हा त्याच्यापेक्षा २५ वर्ष लहान अभिनेत्रीसोबत त्याचे नाव जोडले गेल्याने हि चर्चा देशभर सुरु झाली आहे. त्या अभिनेत्रीचे नाव पूजा हेगडेचं असल्याचेही समजते.

ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा तर अनेक दिवसांपासून सुरु होत्या. त्या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर तर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, सलमानसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर पूजा हेगडेनं प्रतिक्रिया दिली आहे.

सलमान आणि पूजा जेव्हापासून ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात एकत्र काम करत आहे. तेव्हा पासून त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा होत्या. त्यावर पूजा म्हणाली की या सगळ्या अफवा आहेत, असं काही नाही. जितके लोक असतात तितक्या वेगवेगळ्या चर्चा सुरु होतात. आपण सगळ्यांकडे थोडी लक्ष देणार. दरम्यान, पुढे पूजानं खुलासा केला की किसी का भाई किसी की जान हा चित्रपट तिला लॉकडाऊन आधीच मिळाला होता. सलमान खाननं तर सात वर्षांपूर्वीच सांगितलं होतं की आपण लवकरच एकत्र काम करू. याचा खुलासा पूजान ई-टाईम्सनं दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम