…तर सागर समोर येवून प्रेस घेणार ; संजय राऊत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ एप्रिल २०२३ । राज्यातील ठाकरे गट व भाजपसह शिंदे गटावर आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता संजय राऊत यांचा भोंगा पहाटे पहाटे वाजत असतो. ते आपल्याला घाबरतात म्हणून रोज त्यांची टीका सुरू असते, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना लगावला. यावर संजय राऊत यांनीही त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊत म्हणाले कि, मी सागर बंगल्यासमोर येऊन प्रेस घेऊ शकतो. तुम्ही तुमची कटकारस्थाने थांबवा आम्ही तुमच्यावरचे हल्ले थांबवू, या देशात लोकशाही आहे, स्वातंत्र्य आहे. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतोय. मी माझ्या पक्षाचा मुख्य प्रवक्ता आहे, सामनाचा संपादक आहे. त्यात यांच्या पोटात दुखण्यासारखे काय? याचा अर्थ असा आहे की ते आम्हाला घाबरत आहेत. त्यांनी खरी शिवसेना जरी निवडणुक आयोगाकडून दुसऱ्यांना दिली असेल तरी खरी शिवसेना आमच्यात आहे.

कायद्याने राज्य करा. लांड्यालबाड्या करून तुम्ही विरोधी पक्षांना त्रास देत असाल तर आम्ही बोलू. मी तुम्हाला डील देतो, तुम्ही तुमची कारस्थाने थांबवा आम्ही हल्ले थांबवू. मान्य असेल तर तुम्ही सांगा असा टोला राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला. संजय राऊत पुढे म्हणाले, विरोधक एकत्र येणार. काँग्रेसने सगळ्या विरोधकांना एकत्र येऊन मोट बांधण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. राहुल गांधी यांच्या या योजनेचे आम्ही स्वागत करतो. नितीश कुमार, तेजस्वी यादव राहुल गांधींना भेटले. त्यांनी अरविंद केजरीवाल यांची देखील भेट घेतली. काल राहुल गांधी आणि शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे यांची देखील भेट झाली. त्याआधी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट झाली. हे चांगले संकेत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम