संभाजीराराजेंनी दिले सरकारला कडवं आव्हान
बातमीदार | १३ ऑक्टोबर २०२३
राज्यात सध्या सत्ताधारी व विरोधक असा वाद सुरु असतांना आता सत्ताधारी गटाच्या विरोधात युवराज संभाजीराजे छत्रपती देखील मैदानात आले आहे. सत्ताधारी उद्योग मंत्री आणि कामगार मंत्र्यांना नामांकित कंपनीशी बोलण्यास वेळ आहे, पण कामगारांशी बोलायला वेळ नाही. हे सरकार उद्योगपतींसाठी आहे, की कामगारांसाठी असा प्रश्न युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला आहे.
तळेगाव येथे सुरू असलेल्या जनरल मोटर्सच्या कामगारांच्या साखळी उपोषणस्थळी राजेंनी भेट दिली. उपाेषणकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर संभाजीराजेंनी कामगारांना पाठिंबा देत सरकारवर टीकेची झाेड उठवली. संभाजीराजे म्हणाले सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्यावेळीस विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांनी कामगारांना न्याय मिळावा म्हणून पत्र दिलं होते. आता त्यांची जबाबदारी आहे या कामगारांना बोलवून त्यांची बाजू ऐकून घेतली पाहिजे. दरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी असे केले नाही तर मी देखील छत्रपती आणि शाहूंच्या विचारांचा वारसा घेऊन चालणार नेता आहे हे लक्षात ठेवावे. कामगारांना न्याय मिळत नसेल तर सरकारच्या विरोधात माझं कडवं आव्हान असेल असा इशारा राजेंनी सरकारला दिला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम