मुंबई-आग्रा महामार्गावर लक्झरी बसचा अपघात : लहान मुलासह प्रवाशी जखमी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १३ ऑक्टोबर २०२३

राज्यातील अनेक रस्त्यावर अपघाताची मालिका सुरु असतांना एक भीषण अपघात धुळ्यात घडला आहे. पुण्याहून गोरखपूरकडे जात असलेल्या लक्झरी बसचा अपघात झाला आहे. या अपघातात १८ ते २० प्रवासी जखमी झालेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून गोरखपूरकडे जाणाऱ्या लक्झरी बसचा अपघात झाला असून या अपघातात लहान मुलांचा देखील समावेश आहे तर काही लहान मुलंही जखमी झाली आहेत. प्रवाशांनी भरलेली बस रस्त्याने जात असताना समोरील वाहनाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे लक्झरी बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि लक्झरी बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. अपघातानंतर जखमी प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले. शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे मुंबई आग्रा महामार्गावर हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बचाव कार्य करत अपघातग्रस्तांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्यांपैकी पाच प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळालीये.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम