Sanitary Pad – प्रत्येक पती व सासऱ्याने वाचावी अशी पोस्ट …

होय ... मी बॅगेत सॅनिटरी पॅड - Sanitary Pad ठेवणार !

बातमी शेअर करा...

बातमीदार | मंगळवार दि ३० जानेवारी २०२४

Sanitary Pad – प्रत्येक पती व सासऱ्याने वाचावी अशी पोस्ट …

होय … मी बॅगेत सॅनिटरी पॅड – Sanitary Pad ठेवणार !

जळगाव – सागर पार्कवर सुरू असलेल्या बहिणाबाई महोत्सवात आम्ही उभयता काल फेरी टाकली. या महोत्सवात महिला मंडळांचे किंवा महिला कारभारी असलेल्या लघु उद्योग – व्यवसायांचे स्टाॅल असतात.

पती Sanitary Pad

विविध स्टाॅलची पाहणी करीत असताना आमच्या मैत्रिण तथा जळगावच्या ‘पॅड वुमन’ सौ. वैशाली सूर्यकांत विसपुते त्यांच्या ‘फ्लेअर ॲण्ड केअर’ या सॅनिटरी पॅडच्या स्टाॅलवर भेटल्या. त्यांच्या सॅनिटरी पॅड –

Sanitary Pad या उत्पादनाचे सोशल मीडियात प्रचार – प्रसाराचे काम आठ वर्षांपूर्वी मी काही काळ केले होते.

Also Read: Prosperity – समृद्धी शिक्षक फाउंडेशनची                                   कार्यकारणी जाहीर

मासिक पाळीच्या काळात महिलांमध्ये होणाऱ्या नैसर्गिक बदलांची आणि त्यातून होणारी अडचण सौ. विसपुते यांनी मला समजावली होती. कालच्या भेटीत त्या विषयाची उजळणी झाली. आम्ही दोघांनी दोन अनुभव एकमेकास सांगितले.

सौ. विसपुते म्हणाल्या, ‘दोन वर्षांपूर्वी रेल्वे प्रवासात असलेल्या एका महिलेने मला मोबाईलवर काॅल करून विचारले, तुमचा नंबर मला नेटवर मिळाला.

मी प्रवासात आहे आणि मला मासिक पाळी सुरू झाली आहे. या प्रवासात मला कुठे पॅड – Sanitary Pad मिळेल का ?

ते ऐकल्यावर नंतर मी हतबल झाले कारण ती महाराष्ट्रात कोणत्याही स्टेशनजवळ असती तर मी आमच्या विक्रेता किंवा इतरांच्या मदतीने तिला पॅड पोहोचविले असते.

Also Read: https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02Ky9m9MySvrgQMntpGtEPqxJuHvCa8V4Fy8HUbC9zsJb9y8mJkMQWb66Pvv9uygDhl&id=100086002677324&mibextid=Nif5oz

पण ती दुसर्‍या राज्यात होती. मी तिला शांतपणे नकार दिला. या घटनेनंतर मी रेल्वे प्रशासनाशी सतत पत्रव्यवहार करून मागणी करीत आहे की, ‘रेल्वेच्या कॅन्टीन सेवेत सॅनिटरी पॅड उपलब्ध करावेत.’

मी सुद्धा त्यांना आमच्या कौटुंबिक प्रवासात सूनबाईला आलेल्या अडचणीचा किस्सा सांगितला. तुळजापूर – पुणे प्रवासात असताना आम्ही ढाब्यावर जेवायला थांबलो.

तेथे सुनबाई सौ. प्रिती व सौ. सरोज प्रसाधनगृहात गेले. परत येताना सुनबाईचा चेहरा त्रासलेला होता. मी विचारले ‘काय झाले ?’ सौ. सरोज म्हणाली, ‘तीला पाळी सुरू झाली आहे.’ तेव्हा टेबलावर आमचे जेवण आलेले होते. वेटर ते लावत होता.

मी त्याला थांबविले. ढाब्याच्या मालकाला विचारले, ‘जवळ कुठे सॅनिटरी पॅड मिळतील ?’ तो म्हणाला, ‘पाच किलोमीटरवर मेडिकल आहे.’ मी म्हणालो, ‘जेवण नंतर लाव. अगोदर आम्ही पॅड घेऊन येतो.’ तो सुद्धा लगेच ‘हो’ म्हणाला.

आम्ही पाच किलोमीटर गेलो. पॅड घेतले पण ते वापरण्यासाठी प्रसाधनगृह हवे होते. मेडीकलच्या बाजूला दवाखाना होता. तेथील नर्सला विनंती केली. सुनबाई जाऊन पॅडचा वापर करून आली. तिचा चेहरा खुलला होता.

ती मला तीन वेळा म्हणाली, ‘पप्पा धन्यवाद.’ सौ. सरोजही समाधानी होती. मी मुलगा राहिला म्हणालो, ‘बेटा प्रितीच्या अशा अडचणीच्या काळात इतर सर्व कामे बाजूला ठेवायची.

तिला जे हवे ते अगोदर उपलब्ध करायचे. ‘आमची सुनबाई तेव्हापासून मुलगीच झाली आहे. रोहितही कधी कधी म्हणतो, ‘सांगा तुमच्या मुलीला !’

हे दोन्ही किस्से ऐकल्यानंतर मी काल दोन महत्त्वाचे निर्णय घेतले …

👉🏻 १) या पुढे माझ्या प्रवासी बॅगमध्ये २/३ सॅनिटरी पॅडSanitary Pad

असतील …
👉🏻 २) या पुढे माझ्या चारचाकीतील डॅशबोर्डच्या कप्प्यात सॅनिटरी पॅडचे Sanitary Pad पाकिट असेल …

दिलीप तिवारी, जळगाव.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम