संजय राऊतांना जामीन मंजूर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ मे २०२३ ।  राज्यातील ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना नुकताच नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने खा. राऊत यांना ५० हजारांच्या जातमुचलक्यावर २३ तारखेपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करीत दिलासा दिला. नाशिक दौऱ्यावर असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काय होते प्रकरण ?

मुंबई नाका पोलिस ठाण्यातील हवालदार ललित केदारे (रा.बनकर मळा, पुणा रोड, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या शुक्रवारी १२ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असताना, शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये खासदार राऊत यांनी, शिंदे -फडणवीस सरकारवर टीका करताना, हे सरकार तीन महिन्यांत जाणार. हे सरकार घटनाबाह्य आहे. या सरकारने जे आदेश काढले ते सर्व बेकायदेशीर आहे. प्रशासन आणि पोलिसांना माझे आवाहन आहे, की बेकायदा सरकारचे बेकायदा आदेश पाळू नका. ते तीन महिन्यांत जाईल. बेकायदा आदेश पाळाल तर तुम्ही अडचणीत याल. न्यायालयाचा लढा आता अंतिम टप्प्यात आला आहे, असे म्हणाले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम