संजय राऊतांनी केला गंभीर आरोप ; २००० कोटींचा सौदा !
दै. बातमीदार । १९ फेब्रुवारी २०२३ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह दोन्हीही शिंदे यांच्या गटाला देण्यात आले. त्यानंतर ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या या निर्णय़ावर सातत्याने टीका आणि नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच संजय राऊतांनी मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला आहे.
माझी खात्रीची माहिती आहे….
चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत…
हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे..
बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील..
देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते.. pic.twitter.com/3Siiro6O9b— Sanjay Raut (@rautsanjay61) February 19, 2023
खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत हा आरोप केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणतात, “माझी खात्रीची माहिती आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आत्तापर्यंत २००० कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि १०० टक्के सत्य आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं.”
यासोबतच त्यांनी शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या काही ओळीही शेअर केल्या आहेत. “ही न्यायव्यवस्था काहीकांची रखेल झाली आहे. ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे…कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली”, अशा या ओळी आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम