शिवभक्तांची अडवणूक झाल्याने संभाजीराजे छत्रपती चांगलेच आक्रमक !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ फेब्रुवारी २०२३ । राज्यामध्ये सर्वत्र हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती उत्साहामध्ये साजरी केली जात आहे. शिवजयंतीचा मुख्य कार्यक्रम किल्ले शिवनेरीवर होत आहे. या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. या ठिकाणी शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. मात्र, या गर्दीमध्ये सामान्य शिवभक्तांची अडवणूक झाल्याने संभाजीराजे छत्रपती चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी संतप्त भावना आपल्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केल्या.

व्हीआयपी लोकांसाठी शिवभक्तांच्या आडून कशासाठी करता? अशी थेट विचारणा त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. संभाजीराजे यांनी व्यक्त केलेल्या नाराजीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करत त्यांच्या भावना समजावून घेतल्या. ते म्हणाले की, आपल्या भावनांशी आम्ही एकरूप आहोत. आम्ही तुमच्या भावनांची आम्ही दखल घेतली आहे. राज्यातील गडकोट संवर्धन करण्याचं काम सरकारकडून नक्की केले जाईल आणि हे सर्व काम करत असताना आपल्याला विश्वासात घेतले जाईल.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चालत यावं

छत्रपती संभाजीराजेंच्या मते शासकीय शिवजंतीसाठी सामान्य शिवप्रेमींना शिवनेरी किल्ल्यावर येऊ दिलं जात नाही, त्यांना अडवून ठेवल जातं. त्याचबरोबर किल्ले रायगडावर हेलीकॉप्टरला परवानगी नाही, तर शिवनारीवर देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चालत यावं अशी संभाजीराजेनी मागणी केली.

किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत शिवजन्माचा शासकीय सोहळा पार पडत असताना छत्रपति संभाजीराजे गडावर पोहचले. त्याच्यांसोबत त्यांचे अनेक समर्थकही होते. मात्र, मुख्य सोहळा होत असलेल्या शिवाई मंदिरापर्यंत जाण्यास छत्रपती संभाजीराजेंना मनाई करण्यात आली. त्यामुळे जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसमोर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेकांनी विनंती करुनही छत्रपती संभाजीराजे स्टेजवर गेले नाहीत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम