संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल ; …तर गद्दाराशी नाव जोडू नका !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३० जुलै २०२३ | शिवसेनेत बंडखोरी करीत एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी भाजप सोबत सत्ता स्थापन केली असून मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले आहे. त्यांनी जेव्हापासून शिवसेनेची बंडखोरी केल्यानंतर तेव्हापासून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे साहेब यांचा फोटो घेत व त्यांना श्रद्धास्थान मानत आपले राजकीय कारकीर्द घडवत असताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी शिंदे गटावर आज हल्लाबोल केला आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात हिंदी भाषिकांच्या मेळाव्याला काल संबोधित केले यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले त्यानंतर शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंवर देखील टीका करण्यात आली आहे यावेळी आनंदी घे यांच्या अंत्यसंस्काराला ठाकरे गटाचे कुणीही आले नव्हते ते आले असते तर त्यांना दगड मारले असते अशी टीका शिंदे गटाच्या नेत्यांनी देखील केले याला प्रतिउत्तर देत संजय राऊतानी आनंद दिघे यांच्या अंत्यसंस्काराला संपूर्ण ठाकरे कुटुंब होते त्याचा व्हिडिओ असेल तर तुम्ही पहा खरे तर गद्दारांचे नाव आनंद दिघेही जोडणे हा आनंद दिघे साहेबांचा अपमान असून आनंदी घे हे निष्ठावंत शिवसैनिक होते बाळासाहेब ठाकरे शिवसेनेवर त्यांची श्रद्धा होती गद्दारांच्या तोंडी त्यांचे नाव जोडणे हा निष्ठेचा अपमान असल्याचा तोला देखील संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेला लगावला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम